कळत नाही या वाटेवर
असं एकट किती चालायच?
जे नव्हतेच आपलं कधीही
त्यांना का आपलं मानायाचं?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रीष्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगलं मानायाचं?
आहेत शब्द आपणा पाशी
पण इथे नाही कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायचं?
की आपलच कुठेतरी चुकतयं
अस मानून गप्प रहायचं?
नाही ना सापडत उत्तर
म्हणुन प्रश्नांकड़ेच दुर्लक्ष करायचं?
असं एकट किती चालायच?
जे नव्हतेच आपलं कधीही
त्यांना का आपलं मानायाचं?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रीष्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगलं मानायाचं?
आहेत शब्द आपणा पाशी
पण इथे नाही कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायचं?
की आपलच कुठेतरी चुकतयं
अस मानून गप्प रहायचं?
नाही ना सापडत उत्तर
म्हणुन प्रश्नांकड़ेच दुर्लक्ष करायचं?

No comments:
Post a Comment